तनपुरे कारखान्याकडून तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:31+5:302021-03-21T04:19:31+5:30
सन २०२०-२०२१ चे ३१ जानेवारीपर्यंतचे पेमेंट २१०० रुपये प्रतिटन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. १ ते ...

तनपुरे कारखान्याकडून तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
सन २०२०-२०२१ चे ३१ जानेवारीपर्यंतचे पेमेंट २१०० रुपये प्रतिटन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. १ ते १५ फेब्रुवारीचे ऊस उत्पादकांचे पेमेंट ही बँक खात्यात वर्ग करण्याचे काम सुरू असल्याचे ढोकणे यांनी सांगितले.
यंदाच्या गळीत हंगामात तनपुरे कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १ लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस यांनी दिली. यंदाच्या गळीत हंगामात ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा संकल्प करण्यात आल्या असल्याची माहिती ढुस यांनी दिली.
....
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला बंद पडला होता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून कारखान्याचे गळीत हंगाम सुरू आहे. दररोज तीन ते साडेतीन हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यात येणार आहे.
-नामदेवराव ढोकणे,
अध्यक्ष, डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना, राहुरी.