आरआर कोंबडे आणि बेडूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:14+5:302021-09-24T04:24:14+5:30
सध्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची हालचाल सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संघटना सध्या शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम ...

आरआर कोंबडे आणि बेडूक
सध्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची हालचाल सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संघटना सध्या शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम घेत आहे. नुकताच पारनेर येथे शिक्षक नेते बापू तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिक्षक सत्कार सोहळा झाला. यावेळी रावसाहेब रोहोकले यांच्यावर जोरदार टीका झाली. मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे यांनी आरआर कोंबडे कापायचे मीच पाहतो, असे म्हटल्यावर एका शिक्षकाने गणपती बाप्पा विसर्जन झाल्यावर आरआरचा विचार करा, असे म्हटले. त्यानंतर उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले. दुसरीकडे रावसाहेब रोहोकले यांच्या हातातील नेतृत्व हिसकावून घेणारे बापू तांबे यांनी रावसाहेब रोहोकले यांच्या नात्यागोत्याच्या राजकारणावर टीका केली. यावेळी त्यांनी बेडकांची गोष्ट सांगितली. एक शिडी असते. त्या शिडीवर चढणाऱ्या बेडकांना त्यांचे नेतृत्व सांगत असते अरे शिडीवर जाऊ नका, पडाल. मात्र, एक बेडूक थेट शिडी चढून वर गेल्यावर नेतृत्त्वाने एका नातेवाईक बेडकाला विचारले, अरे हे बेडूक वर कसे काय गेले. त्यावेळी नातेवाईक बेडूक म्हणाला, त्या शिडीवर चढलेल्या बेडकाला ऐकू येत नाही, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा हंशा पिकला. त्यामुळे आता बेडूक नेतृत्व, बेडूक नातेवाईक कोण? ऐकू येत नसलेले बेडूक कोण? अन् त्या शिडीवर चढलेले बेडूक कोण, ही खमंग चर्चा सध्या शिक्षकांमध्ये जोरदार सुरू आहे.