मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST2021-05-12T04:21:41+5:302021-05-12T04:21:41+5:30
अंधाळे म्हणाले, मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन ७०० सोडण्यात आले आहे. हे आवर्तन तीन टप्प्यांत सोडण्यात ...

मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन
अंधाळे म्हणाले, मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन ७०० सोडण्यात आले आहे. हे आवर्तन तीन टप्प्यांत सोडण्यात येणार आहे. आज संध्याकाळी १ हजार क्यूसेस, तर बुधवारी १४०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुमारे ४० दिवस चालणार आहे. पाणी सोडल्याने सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणात सध्या १३ हजार ९२२ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक असून, त्यापैकी ९ हजार ४२२ इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. उजव्या कालव्याच्या आवर्तनातून सुमारे ५ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपयोगात येणार आहे. मुळा धरण सलग तीन वर्षांपासून ओवरफ्लो झाली आहे. यंदा मुळा धरणात वाढीव पाणीसाठा दीड हजार दशलक्ष घनफूट शिल्लक राहणार आहे. त्याचा उपयोग पुढील हंगामासाठी करण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.