शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण क्षेत्रात रोटरीचे योगदान कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:22+5:302021-07-23T04:14:22+5:30
अहमदनगर : शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात रोटरी देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीच्या काळात नगर ...

शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण क्षेत्रात रोटरीचे योगदान कौतुकास्पद
अहमदनगर : शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात रोटरी देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. कोरोना महामारीच्या काळात नगर शहरात रोटरी परिवाराने अनेक चांगले उपक्रम राबवून काेरोना रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. रोटरी सेंट्रलचे नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा व त्यांची टीम येत्या काळात आणखी व्यापक समाजकार्य करेल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे नूतन अध्यक्ष ईश्वर बोरा, सेक्रेटरी डॉ. दिलीप बागल यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच रोटरीचे प्रांतपाल रूक्मेश जखोटिया, आमदार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उपप्रांतपाल दादासाहेब करंजुले, माजी प्रांतपाल शिरीष रायते, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, उपप्रांतपाल मनिष नय्यर, माजी उपप्रांतपाल अभय राजे व मनिष बोरा, रोटरी सेंट्रलचे मावळते अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, प्रथम महिला मिनल बोरा, तसेच प्रशांत बोगावत, किरण कालरा, शशी झंवर, सुयोग झंवर, सुवर्णा बरमेचा, प्रगती गांधी, पुरुषोत्तम जाधव, कल्पना गांधी, देविका रेळे, कल्पना मुथा, सोनल फिरोदिया उपस्थित होते.
२२ रोटरी