रोटरी कर्जत सिटीचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:27 IST2020-12-30T04:27:09+5:302020-12-30T04:27:09+5:30

कर्जत : रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर हरिष मोटवाणी व असिस्टंट गव्हर्नर मनीष बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ...

Rotary Karjat City Inauguration Ceremony | रोटरी कर्जत सिटीचा पदग्रहण समारंभ

रोटरी कर्जत सिटीचा पदग्रहण समारंभ

कर्जत : रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर हरिष मोटवाणी व असिस्टंट गव्हर्नर मनीष बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे प्रेसिडेंट प्रा. विशाल मेहेत्रे व सेक्रेटरी घनश्याम नाळे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी माजी प्रेसिडेंट नितीन तोरडमल यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेतला. प्रा. विशाल मेहेत्रे यांनी जुलैपासून आजपर्यंत कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल खराडे, उत्तम मोहोळकर, ओंकार तोटे, अक्षय राऊत, नामदेव गायकवाड, सुरेश वाकचौरे, गोविंद जाधव, अविनाश पुराणे, रवींद्र राऊत, डॉ. अद्वैत विलास काकडे या नूतन रोटरी सदस्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले.

Web Title: Rotary Karjat City Inauguration Ceremony