पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना दिले गुलाबपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:28+5:302021-02-05T06:34:28+5:30
श्रीगोंदा : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी श्रीगोंदा येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पेट्रोलपंपावर गांधीगिरी करण्यात आली. ...

पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना दिले गुलाबपुष्प
श्रीगोंदा : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी श्रीगोंदा येथे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पेट्रोलपंपावर गांधीगिरी करण्यात आली. पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन हेच का अच्छे दिन? असे म्हणत गांधीगिरी करण्यात आली.
वाबळे म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना प्रतिबॅलर १०० ते १२० डॉलर भाव असतानाही पेट्रोलचे दर ७० ते ७२ रुपये प्रतिलिटर होते. सध्याचे भाव प्रतिबॅलर ५० ते ६० डॉलर असतानाही पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९० ते १०० रुपये झाले आहेत.
यावेळी नगरसेवक समीर बोरा, गणेश भोस, अनिकेत भोसले, योगेश मेहेत्रे, आदिल शेख, धीरज खेतमाळीस, जैद अत्तार, जिल्हा सरचिटणीस आदेश शेंडगे, अक्षय नितनवरे, शिवसेनेचे शिवराज ताडे, इंद्रजित शिंदे, सागर वाघमोडे, भूषण शेळके, किरण चव्हाण, रोहन खेडकर, तेजस गलांडे आदी उपस्थित होते.
फोटो : ०१ श्रीगोंदा गांधीगिरी
श्रीगोंदा येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना युवक काँग्रेसच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले.