कामगारांना न्याय देणारी नागवडे कारखान्याची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:34+5:302021-09-19T04:21:34+5:30
श्रीगोंदा : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी सभासद शेतकरी, कामगार, ऊस तोडणी कामगार या घटकांना न्याय देण्याचा नेहमीच कटाक्षाने प्रयत्न ...

कामगारांना न्याय देणारी नागवडे कारखान्याची भूमिका
श्रीगोंदा : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी सभासद शेतकरी, कामगार, ऊस तोडणी कामगार या घटकांना न्याय देण्याचा नेहमीच कटाक्षाने प्रयत्न केला. तीच परंपरा व वसा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार कामगार नेते काॅ. आनंदराव वायकर यांनी काढले.
साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्रिपक्ष समिती सदस्य असलेले नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व साखर कामगार युनियनचे सरचिटणीस काॅ. आनंदराव वायकर यांचा कारखाना कामगारांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले, सहकारात अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने काम करीत सहकारातील सर्व घटकांना न्याय देण्याची स्व. बापूंची शिकवण आहे. व्यवस्थापनाचा नेहमीच तसा प्रयत्न राहीला आहे.
यावेळी उपाध्यक्ष युवराज चितळकर, सुभाषराव शिंदे, अरुण पाचपुते, निवास घाडगे, विलास काकडे, राकेश पाचपुते, प्रा. सुनील माने, विश्वनाथ गिरमकर, अशोक रोडे, विजय कापसे, झुंबर रोडे, पोपटराव बोरुडे, कामगार युनियनचे अध्यक्ष बापूराव नागवडे, चिफ केमिस्ट महेश थोरात, संगणक प्रमुख धनंजय घाडगे, अर्कशाळा प्रमुख बबनराव गोरे उपस्थित होते. युनियनचे उपाध्यक्ष किसनराव कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल गुणवरे यांनी आभार मानले.
---
फोटो आहे