शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'इंदिरा गांधींच्या काळापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न रोहित पवारांनी सोडवला', शरद पवारांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:05 IST

Sharad Pawar & Rohit Pawar: आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

अहमदनगर -  महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी कर्जत-जामखेड तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता.  येथील दुष्काळ हे जुनं दुखणं आहे.  या तालुक्यातील दुष्काळ पाहण्यासाठी शेजारच्या अकोले गावात दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी येथील दुष्काळाची स्वत: पाहणी केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळेपासून आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी आजचा दिवस महिलांच्या आत्मसन्मानाचा, अधिकार वाढविण्याचा दिवस आहे. रोहित पवार या तरुणाच्या हाती सत्ता दिली, याचा  आनंद आहे. त्याने अनेक कामे केली. त्या कामात अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा स्पर्श आहे. अहिल्यादेवी यांनी लोकांना बारवेतून पाण्याची सुविधा दिली. हाच पाण्याचा प्रश्न घेऊन दोन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रोहित पवार यांनी मंत्रालयात अनेक बैठका घेतल्या. आगामी काळात दोन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल. रोहित पवार यांनी या भागात एमआयडीसीहोईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागात लवकरच एमआयडीसी येईल, याची पूर्ण तयारी झाली आहे. अहिल्यादेवी यांचे दळणवळणाचे प्रश्न सोडविले. तोच विचार घेत रोहित पवार यांनी या दोन तालुक्यातून दोन महामार्ग मंजूर करून घेतले.  

गोपीचंद पडळकर यांना अडवलेभाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना दुपारी दोन नंतर चौंडीत येण्याची पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच त्यांनी चौंडीत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले.त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत हेही होते. त्या दोघांनाही आधी चापडगाव येथे व नंतर चौंडीच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. यावेळी दोघांच्या समर्थकांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच चौंडीतील कार्यक्रम राष्ट्रवादीने हयजँक केल्याचा आरोप यावेळी केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण