शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांनी जामखेडमध्ये ३० जेसीबीने उधळला चार टन गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:15 IST

राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला.

जामखेड : राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. शहरातील रस्त्यांवर गुलालाच खच पडला होता. सर्व रस्ते लालेलाल झाले होते. शहरात अशी मिरवणूक प्रथमच निघाली होती. मिरवणुकीनंतर रोहित पवार यांनी साकत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.पवार हे आमदार झाल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात आले होते. कार्यकर्त्यांनी ते येण्याअगोदरच मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती. मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी जेबीसी उभे करण्यात आले होते. रोहित पवारांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील कोठारी पेट्रोलपंपापासून मिरवणुकीत सुरुवात झाली. त्यानंतर जेसीबीच्या बकेटमधून मिरवणुकीवर गुलालाची उधळण केली जात होती. पेट्रोलपंपापासून सुरू झालेल्या मिरवणुकीस बाजार समितीपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर कापून जाण्यास पाच तास लागले. ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राष्टवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक नेते सूर्यकांत मोरे, उद्योजक रमेश आजबे, नगरसेवक पवनराजे राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, दादासाहेब ढवळे, आदींसह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.मिरवणुकीनंतर बाजार समिती आवारात सभा झाली. यावेळी पवार म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रत्येक गावात कुकडीचे पाणी शेतीला मिळावे यासाठी दोन प्रकारचे सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले आहे. अडीच महिन्यात याबाबत अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकारला तो सादर करून पाणी आणण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. मतदारसंघातील आगामी पाच वर्षात काय काम करायचे याबाबत विकास आराखडा तयार करण्याचे काम चार दिवसांपूर्वी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.जामखेड तालुक्यातील साकत येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो होतो. परंतु, त्यापूर्वी जामखेड शहरातील कार्यकर्त्यांनी तुमची मिरवणूक आयोजित केली आहे, असे सांगितले होते. मी मिरवणूक काढण्याबाबत नकार दिला होता. परंतु, कार्यकर्त्यांनी आम्ही तुमचे निवडणूक काळात ऐकले आता तुम्ही आमचे ऐका, असा आग्रह धरला. त्यामुळे जावे  लागले. मिरवणूक छोटी आहे की, मोठी याबाबत कल्पना नव्हती. मिरवणूक सुरू झाल्यानंतर तिचे स्वरूप समजले, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :JamkhedजामखेडRohit Pawarरोहित पवार