रोहिणी कडाडल्या; मान्सूनपूर्व दणका
By Admin | Updated: June 5, 2016 23:40 IST2016-06-05T23:30:25+5:302016-06-05T23:40:08+5:30
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी सायंकाळी वादळ व विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्याने नगर शहरातील झाडे उन्मळून पडली़

रोहिणी कडाडल्या; मान्सूनपूर्व दणका
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी सायंकाळी वादळ व विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ वादळी वाऱ्याने नगर शहरातील झाडे उन्मळून पडली़ नवनागापूर येथे एका घराची भिंत अंगावर पडून बालकाचा मृत्यू झाला. आदित्य साळुंखे (वय १३) असे या बालकाचे नाव आहे. देहरे येथे गाय वीज कोसळून दगावली. पाथर्डी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक रात्री उशीरापर्यंत ठप्प झाली होती. नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, राहुरी, पाथर्डी, अकोले, शिर्डी, कोल्हार परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
मान्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात जोरदार आगमन झाले आहे़ रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली़ सुरुवातीला आलेल्या वादळामुळे शहरासह केडगाव उपनगरांतील झाडे उन्मळून पडली़ त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहरात सर्वत्र अंधार होता़ रस्त्यातील सखल भागात पाणी साचले होते़ सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता़ नेवासा तालुक्यातील सोनई गावात वादळी पावसाने काही घरांवरील पत्रे उडाले़ घोडेगाव, चांदा, कुकाणा परिसरात हलक्या सरी बरसल्या़ पारनेर, भाळवणी, कान्हूरपठार, वाळवणेत जोरदार पाऊस झाला़ नगर तालुक्यातील विळद येथे वीज कोसळून एक गाय दगावली़ वडगाव तांदळी भागात फळबागांना वादळाचा तडाखा बसला़ दरम्यान, रात्री उशीरा पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर परिसरात पाऊस झाला. शेवगाव-पैठण राज्यमार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कासार पिंपळगाव मार्गे वळविण्यात आली होती. वृध्देश्वर कारखान्याची संरक्षण भिंतीवर झाड पडल्याने दूध संघ, व्यावसायिकांच्या नुकसान झाले.
शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसात नगर तालुक्यातील अरणगाव येथील रहिवासी दादा शंकर ढमढरे (वय, ५५) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर अश्विन संतोष ढमढरे (वय २३) हा जबर जखमी झाला़ तर पाथर्डी व नगर तालुक्यातील सुमारे ७५ घरांची पडझड झाली. (प्रतिनिधी)
४१ मंडळात पाऊस (पाऊस मिलीमीटरमध्ये)
श्रीगोंदा- ४८, पेडगाव-४८, काष्टी-४८़२, चिंभळा-४५, बेलवंडी-४०, देवदैठण-२५, मांडगण-४५. कर्जत- ६३, राशीन-३४, भांबोरी-२२, कोंभळी-१२, माही-५०. जामखेड-१८, खर्डा-१२, नायगाव-१६, अरणगाव-६़ २, नान्नज-१२. नगर-४, रुईछत्तीसी-६२,भिंगार-६़४, वाळकी-२५. पाथर्डी-३२,टाकळीमानूर-५९,कोरडगाव-३, करंजी-२२, मिरी-३, माणिकदौंडी-५५. शेवगाव-३, बोधेगाव-१४, चापडगाव-१६, भातकुडगाव-४, एरंडगाव-५. श्रीरामपूर-२, वाडेगव्हाण-२० साकूर-१, घारगाव-३, डोळासणे-५.