शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यात दरोडा : मारहाणीत महिला जखमी, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 15:46 IST

कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील एका शेतकरी कुटुंबावर शनिवारी (दि.९) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी घराचा दरवाजा दगडाने तोडून घरातील रोख रकमेसह कपाटातील दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा दरोडा टाकून मुद्देमाल लुटून नेला आहे. दरोडेखोरांनी घरात एकट्याच असलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५)  यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले आहे. 

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील एका शेतकरी कुटुंबावर शनिवारी (दि.९) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी घराचा दरवाजा दगडाने तोडून घरातील रोख रकमेसह कपाटातील दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा दरोडा टाकून मुद्देमाल लुटून नेला आहे. दरोडेखोरांनी घरात एकट्याच असलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय-४५)  यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले आहे. 

     याप्रकरणी कमलबाई लक्ष्मण जोरवर ( रा. ओगदी ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोराविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे कमलबाई लक्ष्मण जोरवर ह्या आपल्या पती लक्ष्मण तुकाराम जोरवर यांच्या समवेत राहतात. शनिवारी रात्री त्यांचे पती हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कुलुप लावले होते. त्यांची पत्नी कमलबाई यांनी आतून दार लावून झोपल्या.

     रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरानी दरवाजाला असलेले कुलूप तोडले. त्यानंतरही दार उघडले नसल्याने दरोडेखोरांनी दार तोडण्यास सुरवात केली. त्यावर आत आलेल्या कमलाबाई जोरजोराने ओरडू लागल्याने दरोडेखोरांनी त्यांना दार उघडण्यास सांगितले. त्यास कमलबाई यांनी विरोध दर्शविला. त्यावर दरोडेखोरानी दगडी पाट्याने दरवाजा तोडून घरातील कपाटातील ५० हजार रुपये रोख रकमेसह २ लाख ६८ हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडेखोरानी लुटून नेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी