दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:57+5:302021-02-05T06:38:57+5:30
रियाज शफी शेख, आजम नसीर शेख, करण अनिल अवचिते, दानिश अयुब पठाण व बाबर जानमहम्मद शेख असे अटक करण्यात ...

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
रियाज शफी शेख, आजम नसीर शेख, करण अनिल अवचिते, दानिश अयुब पठाण व बाबर जानमहम्मद शेख असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. यावेळी बल्ली ऊर्फ बलीराम यादव हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या आरोपींकडून एक स्टीलचा सुरा, लोखंडी कत्ती, चाकू, कटावणी, मिरची पूड, मोबाईल, एक विनाक्रमांकाची मोटारसायकल, एक ॲक्टिव्हा मोपेड असा एकूण १ लाख ३ हजार ५५५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर, तोफखाना, मनमाड, नाशिक, नेवासा, श्रीरामपूर, कोतवाली, भिंगार, कोपरगाव आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
०२ आरोपी
ओळी - दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली.