ओगदी येथील शेतकरी कुटुंबावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST2021-01-10T04:15:18+5:302021-01-10T04:15:18+5:30
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे कमलबाई लक्ष्मण जोरवर व लक्ष्मण तुकाराम जोरवर राहतात. शनिवारी रात्री कमलबाई यांचे पती शेतात पाणी ...

ओगदी येथील शेतकरी कुटुंबावर दरोडा
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे कमलबाई लक्ष्मण जोरवर व लक्ष्मण तुकाराम जोरवर राहतात. शनिवारी रात्री कमलबाई यांचे पती शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते. आतून त्यांची पत्नी कमलबाई यांनी दार लावून झोपी गेल्या होत्या. रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी दरवाजाला असलेले कुलूप तोडले. त्यानंतरही दार उघडले नसल्याने दरोडेखोरांनी दार तोडण्यास सुरुवात केली. त्यावर आत आलेल्या कमलबाई जोरजोराने ओरडू लागल्याने दरोडेखोरांनी त्यांना दार उघडण्यास सांगितले. त्यास कमलबाई यांनी विरोध दर्शविला. त्यावर दरोडेखोरांनी दगडी पाट्याने दरवाजा तोडून घरातील कपाटातील ५० हजार रुपये रोख रकमेसह दोन लाख ६८ हजार किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. दरम्यान, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.
..............
फोटो०९- दरोडा, कोपरगाव
090121\img-20210109-wa0052.jpg
दरोड्यात मारहाण झालेल्या कमलबाई जोरवर ह्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.