दरभंगा एक्प्रेसमध्ये लूट

By Admin | Updated: September 2, 2023 12:46 IST2014-05-14T23:02:37+5:302023-09-02T12:46:01+5:30

अहमदनगर: पुणे-वाराणशी या दरभंगा एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी सारोळा कासार (ता. नगर) येथे क्रासिंग लाईनवर थांबली असताना तीन इसमांनी रेल्वेत प्रवेश करून प्रवाशांची लूट केली.

Robbery in Darbhanga Express | दरभंगा एक्प्रेसमध्ये लूट

दरभंगा एक्प्रेसमध्ये लूट

अहमदनगर: पुणे-वाराणशी या दरभंगा एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी सारोळा कासार (ता. नगर) येथे क्रासिंग लाईनवर थांबली असताना तीन इसमांनी रेल्वेत प्रवेश करून प्रवाशांची लूट केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. अज्ञात तिघांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांकडील मौल्यवान वस्तु काढून घेतल्या आणि धूम ठोकली. त्यांच्याजवळील रोख रक्कमही हिसकावून घेतली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर तिघेजण मौल्यवान वस्तुंसह पळून गेले. रेल्वे निघून गेल्याने ज्यांची लूट झाली ते तक्रार देण्यास हजर नव्हते. नाशिक येथील एका प्रवाशाने हा प्रकार पाहिला आणि त्यांनीच पोलिसांना खबर दिली. रेल्वे लाईनवर भिक्षेकरी भिक्षा मागण्यासाठी रेल्वेत चढले. भिक्षा देण्यावरून प्रवाशी आणि अज्ञात इसम यांच्यात वाद झाले. त्यातून त्यांनी प्रवाशांना मारहाण केली.

Web Title: Robbery in Darbhanga Express