लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:17 IST2018-12-18T15:16:43+5:302018-12-18T15:17:13+5:30

स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालक व दुकानदारांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़

Robbers robbery robbers | लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

लूटमार करणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर : स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देण्याचे आमिष दाखवून हॉटेलचालक व दुकानदारांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़
मोहन नश्या भोसले (वय ३० रा़ शिरसगाव बोडखा ता़ श्रीगोंदा), विशाल सुरेश पवार (रा़ लोणी व्यंकनाथ) व निलेश हरिभाऊ पवार (रा़ निंबवी ) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत़ या तिघांसह त्यांचे साथीदार चलाश्या सीताराम भोसले, गोरख चलाश्या भोसले, खाल्या काळे असे मिळून लुटमार करतात़ या टोळीतील मोहन भोसले हा देशमुख पाटील या नावाने वावरतो़ मोहन याने मिरजगाव येथील दीपक कोंडीबा गोरे यांना स्वस्तात किराणा माल व तेलाचे डबे देतो असे आमिष दाखविले़ गोरे यांना ७ डिसेंबर रोजी सारोळा कासार (ता़ नगर) येथे निर्जन ठिकाणी बोलावून घेतले़ यावेळी तेथे लपून बसलेल्या इतरांनी गोरे यांच्यावर हल्ला करत त्यांच्याकडील १ लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत गोरे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़
या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना आरोपीविषयी माहिती मिळाली होती़ सहायक निरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक भागीनाथ पंचमुखी, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, दीपक शिंदे, नवगिरे, भोपळे यांच्या पथकाने श्रीगोंदा परिसरातून या तिघा लुटारूंना अटक केली़

Web Title: Robbers robbery robbers