घरफोडी करून सोन्याचे दागिने लुटले

By Admin | Updated: November 7, 2016 00:58 IST2016-11-07T00:23:44+5:302016-11-07T00:58:11+5:30

अहमदनगर : नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले़

Robbed gold ornaments by burglar | घरफोडी करून सोन्याचे दागिने लुटले

घरफोडी करून सोन्याचे दागिने लुटले


अहमदनगर : नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले़ याप्रकरणी मच्छिंद्र विष्णू मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
टाकळी खातगाव येथील मेढे यांच्या घरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार चोरट्यांनी प्रवेश करत मेढे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, मुलीच्या कानातील रिंगा व मुलाच्या गळ्यातील सोन्याच पत्ता असे २९ हजार रुपयांचे दागिने लुटले़ याबाबत मेढे यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ या घटनेने टाकळी खातगाव परिसरात घबराट पसरली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे़ नगर तालुक्यात गेल्या काही दिवसांत घरफोडीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे़ पोलिसांना मात्र, या चोऱ्यांचा तपास लावता आलेला नाही़

Web Title: Robbed gold ornaments by burglar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.