वांबोरीतील प्रसाद कारखान्याचा भुसा पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:04 IST2018-01-19T13:03:34+5:302018-01-19T13:04:04+5:30

राहुरी : वांबोरी (ता. राहुरी ) येथील प्रसाद शुगर कारखान्याचा भुसा शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेटला. कारखान्यातील ...

Roast of Prasad factory at Vambori | वांबोरीतील प्रसाद कारखान्याचा भुसा पेटला

वांबोरीतील प्रसाद कारखान्याचा भुसा पेटला

राहुरी : वांबोरी (ता. राहुरी) येथील प्रसाद शुगर कारखान्याचा भुसा शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेटला.
कारखान्यातील भुसा हा डिस्टलरीसाठी वापरला जातो. त्यामुळे हा भुसा कारखान्यांच्या उत्पन्नाचा घटक असतो. प्रसाद कारखान्याच्या बाजूलाच हा भुसा साठविण्यात आलेला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक या भुशाने पेट घेतला. ही बाब कामगाराच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ कारखाना प्रशासनाला ही माहिती दिली. त्यामुळे कारखाना प्रशासनाने अग्निशमन बंब पाचारण केले. काही वेळातच देवळाली प्रवरा नगरपालिकेचा १ बंब व राहूरी नगरपालिकेचे २ बंब कारखाना स्थळावर हजर झाले. या तीन अग्निशामक बंबांच्या सहाय्याने ३ तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.

Web Title: Roast of Prasad factory at Vambori