रस्ता सुरक्षा अभियान; संगमनेरात वाहनांना लावले रिफ्लेक्टर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:49+5:302021-02-06T04:36:49+5:30
मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी दुचाकीधारकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन केले. दैनंदिन उपयोगातील प्राथमिक वाहतूक नियम, त्यात चालकाकडून होणाऱ्या ...

रस्ता सुरक्षा अभियान; संगमनेरात वाहनांना लावले रिफ्लेक्टर्स
मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी दुचाकीधारकांना वाहतूक नियमांबद्दल मार्गदर्शन केले. दैनंदिन उपयोगातील प्राथमिक वाहतूक नियम, त्यात चालकाकडून होणाऱ्या चुका व त्याचे परिणाम याबाबत त्यांनी माहिती दिली. आपले वाहन सुस्थितीत ठेवावे व हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन निमसे यांनी केले. रस्ते अपघातात दुचाकी वाहनाचे प्रमाण जास्त आहे. मोटारसायकलचे मागील दिवे बंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. दुचाकीला मागे लाल रिफ्लेक्टर्स असल्यास असे अपघात कमी होऊ शकतात. याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक खान यांच्या संकल्पनेतून शहरातील दोन हजार दुचाकींना लाल रंगाचे रिफ्लेक्टर्स परिवहन कार्यालयातर्फे मोफत लावण्यात आले. प्रांताधिकारी डाॅ. शशिकांत मंगरूळे, सीए कैलास सोमाणी, राजेन्द्र होंडाचे संचालक ओंकार सोमाणी,डॉ. सुचित गांधी, महेश नावंदर आदी उपस्थित होते.