शेताच्या बांधावर बैठक घेऊन मिटविला रस्त्याचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:25+5:302021-01-25T04:21:25+5:30

नेवासा : तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद ...

The road dispute was settled by holding a meeting on the farm dam | शेताच्या बांधावर बैठक घेऊन मिटविला रस्त्याचा वाद

शेताच्या बांधावर बैठक घेऊन मिटविला रस्त्याचा वाद

नेवासा : तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर राहणारे शेतकरीही चिंतेत होते. मात्र, युवा नेते प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये समेट घडवून हा वाद सोडविला.

आता रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी प्रशांत गडाख यांना धन्यवाद दिले. वाद सामंजस्याने मिटविणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी प्रशांत गडाख यांनी गौरव केला.

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व प्रशांत गडाख यांनी निवडणूक प्रचारावेळी भालगाव येथील गुप्ताईदेवी परिसरातील दुर्लक्षित रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रशांत गडाख यांनी पुढाकार घेऊन २५ लाखांचा निधी मंजूर केला. काम सुरू झाले; मात्र रस्ता काम सुरू असताना बांधावर पाईप टाकण्याच्या वादामुळे रस्त्याचे काम बंद पडले. त्यामुळे या भागातील सर्वजण चिंतेत होते. हे समजल्यानंतर प्रशांत गडाख यांनी तातडीने भालगाव गुप्ताई रस्त्याची पाहणी केली. वाद असलेल्या काही शेतकऱ्यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढत गावकऱ्यांचे हित व एकोपा जोपासण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. वाद मिटल्याने रस्त्याच्या रखडलेल्या कामास सुरुवात झाली.

---------

सर्व गावकऱ्यांनी असेच गट-तट बाजूला ठेवून विकासकामांत सहकार्य केल्यास गावाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे मंत्री शंकरराव गडाख यांनाही काम करण्यास हुरूप येईल. आज जो प्रश्न समझोत्याने सुटला आहे, त्याचा आदर्श आपण दत्तक घेतलेल्या बेलपिंपळगाव गटातील इतर गावांनीही घ्यावा.

-प्रशांत गडाख,

अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान

फोटो : २४ नेवासा गडाख

भालगाव येथे रस्ता वाद मिटविल्यानंतर प्रशांत गडाख यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला.

Web Title: The road dispute was settled by holding a meeting on the farm dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.