कुकाणा येथे रस्ता काँक्रिटीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:07+5:302021-06-04T04:17:07+5:30
कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दलित वस्ती अंतर्गत दोन लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात ...

कुकाणा येथे रस्ता काँक्रिटीकरण सुरू
कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे दलित वस्ती अंतर्गत दोन लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
गाव अंतर्गत खराब झालेल्या रस्त्यामुळे ऐन पावसाळ्यात गटारी, नाल्या तुडुंब होऊन रस्त्यावर गटारीचे पाणी साचून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर सरपंच लताबाई अभंग यांनी लक्ष देत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. वार्ड क्रमांक दोनमधील दत्तनगर भागात दलित वस्ती अंतर्गत दोन लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ ग्रामपंचायत सदस्या हकिमाबी शेख व अरुणा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमोल अभंग, माजी सरपंच एकनाथ कावरे, माजी सरपंच दौलत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र जाधव, रज्जाकशहा इनामदार, हकिमाबी शेख, ॲड. गणेश निकम, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, मनसेचे विलास देशमुख कारभारी गोर्डे यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते.
----
०३ कुकाणा