वडझिरेसह तीन गावांचे रस्ते बंद
By Admin | Updated: October 5, 2016 00:23 IST2016-10-05T00:13:08+5:302016-10-05T00:23:25+5:30
पारनेर : पारनेर तालुक्यात गेले दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने व पुलावरून पाणी वाहत असल्याने सोमवारी पारनेर-अळकुटी मार्गावरील वडझिरे पूल, पिंपरी जलसेन रस्ता

वडझिरेसह तीन गावांचे रस्ते बंद
पारनेर : पारनेर तालुक्यात गेले दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने व पुलावरून पाणी वाहत असल्याने सोमवारी पारनेर-अळकुटी मार्गावरील वडझिरे पूल, पिंपरी जलसेन रस्ता, किन्ही-धोत्रे हे मार्ग सुमारे दोन तास ठप्प होते. यामुळे शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, शेतकरी यांची मोठी तारांबळ उडाली.
पारनेर तालुक्यात सुमारे २२० तलाव अजूनही कोरडे आहेत. परंतु घटस्थापनेपासून सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस पारनेर शहरासह पुणेवाडी, हंगा, वाघुंडे, पिंपरी जलसेन, चिंचोली, वडझिरे, धोत्रे, करंदी, गोरेगाव गावांमधील ओढे वाहू लागल्याने परिसरातील काही बंधाऱ्यांना पाणीही आले. पारनेर-अळकुटी मार्गावर वडझिरे दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने सुमारे दोन तास अळकुटी-पारनेर वाहतूकठप्प झाली होती. पिंपरी जलसेन व चिंचोली जवळील पुलांवरूनही पूर जात असल्याने संध्याकाळी घरी परतणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. त्यांना सुमारे तासभर रस्त्यावरच अडकून पडावे लागले.पारनेर शहरातील शिरपूर पॅटर्नचे बंधारेही पूर्णपणे भरून वाहत असल्याचे चित्र मंगळवारी सकाळपर्यंत दिसून येत होते. शहराजवळील बंधारे भरले आहेत तर सेनापती बापट तलावात काही प्रमाणात पाणीसाठा आला आहे. हंगा येथील बंधारेही भरले आहेत.
(तालुका प्रतिनिधी)