शहरातील रस्ते अंधारात

By Admin | Updated: March 17, 2016 23:41 IST2016-03-17T23:32:44+5:302016-03-17T23:41:58+5:30

अहमदनगर : महावितरणची महापालिकेकडे असलेली अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी वीज तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून गुरूवारी करण्यात आली.

Road to the city in the dark | शहरातील रस्ते अंधारात

शहरातील रस्ते अंधारात

अहमदनगर : महावितरणची महापालिकेकडे असलेली अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी वीज तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून गुरूवारी करण्यात आली. या कारवाईमुळे नगर शहरातील रस्ते अंधारमय झाले आहेत.
शहरातील पथदिव्यांसाठी महापालिका महावितरण कंपनीकडून वीज घेते. त्याचे वीज बिल महापालिकेकडून महावितरण कंपनीला अदा करते. अहमदनगर महापालिकेकडे महावितरणची ५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र नेहमीप्रमाणे देऊ असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. वीज बिल अदा केले नाहीतर वीज तोडण्याची नोटीस महावितरण कंपनीने महापालिकेला पाठविली. मात्र त्यालाही महापालिकेने गांभीर्याने घेतले नाही. शहर विभागाच्या उपकार्यकारी अभियंता भालेराव यांनी स्वत: महापालिकेत पाच वेळेस पाठपुरावा केला. त्यालाही महापालिकेने प्रतिसाद दिला नाही. वसुलीसाठी अखेर महापालिकेची वीज तोडण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला. गुरूवारी दुपारनंतर वीज तोडण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे शहरातील पथदिवे गुरूवारी रात्री लागलेच नाही. त्यानंतर नागरिकांना वीजजोड तोडल्याची माहिती समजली. माळीवाडा, बुरूडगाव, केडगाव, सारसनगर, भवानीनगर, टिळक रस्ता, पॉवर हाऊन परिसर पथदिवे न लागल्याने अंधारात बुडाला.
(प्रतिनिधी)
महापालिकेकडे महावितरण कंपनीची अडीच कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरा अन्यथा वीज तोडण्याची नोटीस महावितरण कंपनीने पाठविली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुपारी साडेचार वाजता महापालिकेची वीज तोडण्यात आली.
-भालेराव, उपकार्यकारी अभियंता,शहर विभाग.

Web Title: Road to the city in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.