आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:57+5:302021-07-19T04:14:57+5:30
पठारभागात अधूनमधून कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यालगत डोंगररांगा आहेत. हा रस्ता ...

आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली
पठारभागात अधूनमधून कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यालगत डोंगररांगा आहेत. हा रस्ता नाशिक-पुणे महामार्ग ते आंबी खालसा, तांगडी, कोठे खुर्द, चासपासून पुढे अकोले तालुक्याला जोडला गेलेला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास येथील भानुशीमळा परिसरातील रस्त्यालगतच्या डोंगराचे दगड सुटे झाल्याने ते घरंगळत येऊन रस्त्यावर पडले. दगड मोठे असल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. या रस्त्यालगतच्या खालच्या बाजूला लोकवस्ती आहे. हे दगड रस्त्यावरच अडकल्याने लोकवस्तीकडे सरकले नाहीत. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
फटांगरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदीश कडाळे यांच्याशी संपर्क केला. सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने दगड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
फोटो आहे