आर.के .लक्ष्मण नगर भेट झाली ताजी
By Admin | Updated: January 28, 2015 13:57 IST2015-01-27T23:38:27+5:302015-01-28T13:57:50+5:30
दिवंगत ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के . लक्ष्मण १६ वर्षापूर्वी एका कार्यक्रमासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी महावीर कलादालनात काढलेले सारे जहाँ से अच्छा या पेन्सील चित्राचे कौतुक केले होते. यावेळी कांबळे यांनी लक्ष्मण यांचे पेन्सीलचित्र रेखाटले, तर लक्ष्मण यांनी कांबळे यांचे व्यंगचित्र काढले होते. व्यंगचित्रकार लक्ष्मण यांच्या निधनामुळे १६ वर्षापूर्वीच्या नगरभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. कांबळे यांच्या आग्रहाखातर लक्ष्मण दहा मिनिट महावीर कलादालनात आले होते. मात्र, त्या ठिकाणी रमल्याने त्यांनी तब्बल या ठिकाणी एक तास दिला होता. अवघ्या दोन मिनिटात लक्ष्मण यांनी कांबळे यांचे व्यंगचित्र काढले आणि त्यावर स्वाक्षरीही केली होती. ही आठवण कांबळे यांनी ताजी केली.

आर.के .लक्ष्मण नगर भेट झाली ताजी
अहमदनगर : दिवंगत ख्यातनाम व्यंगचित्रकार आर.के . लक्ष्मण १६ वर्षापूर्वी एका कार्यक्रमासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी महावीर कलादालनात काढलेले सारे जहाँ से अच्छा या पेन्सील चित्राचे कौतुक केले होते. यावेळी कांबळे यांनी लक्ष्मण यांचे पेन्सीलचित्र रेखाटले, तर लक्ष्मण यांनी कांबळे यांचे व्यंगचित्र काढले होते. व्यंगचित्रकार लक्ष्मण यांच्या निधनामुळे १६ वर्षापूर्वीच्या नगरभेटीच्या आठवणी ताज्या झाल्या. कांबळे यांच्या आग्रहाखातर लक्ष्मण दहा मिनिट महावीर कलादालनात आले होते. मात्र, त्या ठिकाणी रमल्याने त्यांनी तब्बल या ठिकाणी एक तास दिला होता. अवघ्या दोन मिनिटात लक्ष्मण यांनी कांबळे यांचे व्यंगचित्र काढले आणि त्यावर स्वाक्षरीही केली होती. ही आठवण कांबळे यांनी ताजी केली.
..................