पाथर्डी तालुक्यात नद्या, ओढ्यांना पूर, तलाव ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:15+5:302021-09-02T04:45:15+5:30
या पावसाचा फटका पाथर्डी शहरालाही बसला असून, शहरात नव्यानेच झालेल्या बांधकामाच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने सुमारे २०-२५ दुकानांचे नुकसान झाले ...

पाथर्डी तालुक्यात नद्या, ओढ्यांना पूर, तलाव ओव्हरफ्लो
या पावसाचा फटका पाथर्डी शहरालाही बसला असून, शहरात नव्यानेच झालेल्या बांधकामाच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने सुमारे २०-२५ दुकानांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांना दुकानदारांनी केली आहे. भानुप्रयाग इमारतीमध्ये महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. बँकेच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व्हर व इतर साहित्य खराब झाल्यामुळे बँक दोन ते तीन दिवस बंद राहू शकते, असे सांगण्यात येते.
..................
ऋषिकेश ढाकणे यांनी कोरडगाव परिसर, तसेच शेवगाव तालुक्यातील काही गावांत जाऊन नुकसानीची माहिती घेतली, तसेच लोकांना धीर दिला. माजी आमदार प्रताप ढाकणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नुकसानीची माहिती दिली असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी कोरडगाव परिसरास भेट दिली.