शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी साईदरबारी हजेरी लावणारे ऋषी कपूर; निधनानं शिर्डी हळहळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 13:36 IST

शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध

- प्रमोद आहेरशिर्डी: पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर कुटुंब साईबाबांशी जोडले गेले. त्यांच्यानंतर राज कपूर व त्यानंतर ऋषी कपूर यांनी ही भक्तीची परंपरा कायम ठेवली. प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी कपूर कुटुंबाने साईबाबांना साकडे घातले आहे.रणबीर कपूर व कतरीना कैफच्या संबंधामुळे नाराज असलेल्या ऋषी कपूर यांनी १७ डिसेंबर २०१५ रोजी साईदरबारी येऊन बाबांना साकडे घातले होते. साईबाबांनी ऋषी कपूर यांचे गाव्हाणे ऐकले आणि महिनाभरातच रणबीर कपूर व कॅतरीना कैफ वेगळे झाले. यामुळे आनंदीत झालेल्या ऋषी कपूर यांनी नितू कपूर यांच्यासह पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये साई दरबारी हजेरी लावून बाबांना धन्यवाद दिले होते, अशी माहिती साईबाबा संस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल बाजीराव शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर अगदी लहानपणापासून शिर्डीला येत असल्याने शिंदे यांनी ऋषी यांच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या. पूर्वी समाधी चौथऱ्यावर चढून पुजा करण्यात येत असे, आपल्याला ती संधी अनेकदा मिळाली होती, असेही ऋषी कपुर म्हणाले होते. संपर्कात आलेली माणसे जोडणे हा त्यांचा छंद होता. त्यामुळे ते अनेकदा फोन करून आपली चौकशीही करत असेही शिंदे यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांची आठवण सांगताना माजी मंदिर प्रमुख प्रकाश खोत यांनी सांगितले की, १९७३ च्या सुमारास बॉबी चित्रपटाची इगतपुरीजवळ शुटींग सुरू होते. तेव्हा राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण युनिट साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी दिक्षीत वाड्यातील प्रसादालयात या सर्वांनी भोजन घेतले होते.

समाधी चौथऱ्यावरील मार्बलच्या जाळीला राज कपूर यांच्या देणगीतुन चांदीचे वेष्टन लावण्यात आले होते. त्यावेळी राज कपूर, कृष्णा कपूर व ऋषी कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थीत होते असेही खोत यांनी सांगितले. येथील मच्छिंद्र हिंगणे व या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिर्डी आणि कपूर घराण्याचे तीन पिढ्यांपासून कौटुंबिक संबंध आहेत. ऋषी कपूर यांनी हा ओलावा कायम ठेवला, आज त्यांच्या सारख्या साईभक्ताच्या जाण्याने शिर्डी हळहळली आहे.

टॅग्स :Rishi Kapoorऋषी कपूरshirdiशिर्डी