मागासवर्गीय पदोन्नती निर्णय रद्द करण्याची रिपाईंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:40+5:302021-06-09T04:26:40+5:30
रिपाई (अ) संघटनेच्यावतीने तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा ...

मागासवर्गीय पदोन्नती निर्णय रद्द करण्याची रिपाईंची मागणी
रिपाई (अ) संघटनेच्यावतीने तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर १ जून ते ७ जूनपर्यंत सरकारच्या निर्णयाविरुद्ध आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जोपर्यंत आघाडी सरकार मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण कायम करीत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. रिपाईचे राज्य सचिव विजय वाकचौरे, शांताराम संगारे, सुरेश देठे, रमेश शिरकांडे, राजेंद्र गवांदे, किशोर शिंदे, संदीप शिंदे, राजेंद्र आव्हाड, शंकर संगारे, सचिन खरात, पांडुरंग पथवे आदींनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना सोमवारी निवेदन दिले.