शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन लांबणीवर; पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 17:40 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.२७९ पाणी वापर संस्थांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी नोंदणी झाली असून आणखी १५ हजार हेक्टर पाणी मागणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुळा धरणाचा डावा कालवा १० मार्चला सुरू करण्यात आला. डाव्या कालव्याखाली १३० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करण्यात आला आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र डाव्या कालव्याखाली ओलीताखाली येण्याची शक्यता आहे. उजव्या कालव्यातून चार दिवसात पाणी सोडण्यात येईल, अशी घोषणा ९ मार्चला मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. १३ मार्चच्या दरम्यान उजव्या कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यता होती़. मात्र अद्याप पाणी न सुटल्याने शेतक-यांचे लक्ष पाटबंधारे खात्याकडे वेधले आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर संस्था आहेत. पाणी वापर संस्थांनी पाटबंधारे खात्याकडे पाण्याची मागणी नोंदविली आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे़ त्यामुळे उजव्या कालव्याखालील पिकांची भूक वाढलेली आहे. पाणी कधी सोडणार? असा पश्न शेतकरी विचारत आहेत. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून १३ मार्चला पाणी सुटणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर केले होते़. प्रत्यक्षात रविवारी दुपारपर्यंत पाणी सुटलेले नाही़. त्यामुळे ऊस लागवडी धोक्यात आल्या आहेत़. याशिवाय कांदा, गहु पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत़. उन्हाची तीव्रता वाढली असून पाटबंधारे खात्याने त्वरीत उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे़, अशी खडांबे खुर्द येथील शेतकरी विठ्ठल कार्ले यांनी सांगिेतले. मुळा उजव्या कालव्याखाली २० हजार हेक्टर पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे.  उजव्या कालव्यातून महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ६० क्युसेकने पाणी परवापासून सुरू आहे. धरणात सध्या २० हजार ३०२ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल़, असे मुळा धरणाचे अधीक्षक अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी