शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

पारनेरमध्ये कार्यकर्ता ठरला लय भारी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:52 IST

मतदारांबरोबरच थेट संपर्क, युवकांचा मोठा सहभाग, मुंबईकरांचे वाढलेले मतदान, उदय शेळके, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीची एकजूट, सभापती राहुल झावरे यांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा ६० हजार ९२८ मतांनी पराभव करत त्यांचा विजयी चौकार रोखला. लंके यांनी औटींचा पराभव करत पारनेर हा शिवसेनेचा गड उद्ध्वस्त केला. जनतेने औटी, काशिनाथ दाते, सुजित झावरे यांची मतलबी युती नाकारल्याचे दिसून येते.

पारनेर विधानसभा विश्लेषण-विनोद गोळे । पारनेर : मतदारांबरोबरच थेट संपर्क, युवकांचा मोठा सहभाग, मुंबईकरांचे वाढलेले मतदान, उदय शेळके, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीची एकजूट, सभापती राहुल झावरे यांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा ६० हजार ९२८ मतांनी पराभव करत त्यांचा विजयी चौकार रोखला. लंके यांनी औटींचा पराभव करत पारनेर हा शिवसेनेचा गड उद्ध्वस्त केला. जनतेने औटी, काशिनाथ दाते, सुजित झावरे यांची मतलबी युती नाकारल्याचे दिसून येते.पारनेर विधानसभा मतदारसंघात औटी व लंके यांच्यातच दुरंगी लढत झाली. लंके यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपणाला काय पराभूत करणार? या भ्रमात औटी होते. संदेश कार्ले व शिवसैनिकांनी अगोदर औटी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारला होता. पण, कार्ले यांनी तलवार म्यान केली. मात्र, या सर्व जुळवाजुळवीनंतरही औटी पराभूत झाले. औटी यांना सलग तीन निवडणुकीमध्ये साथ देणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नंदकुमार झावरे, त्यांचे पुत्र पंचायत समिती सभापती राहुल झावरे हेही यावेळी दुरावले होते. ऐन मतदानाच्या दिवशी सचिन वराळ व विखे गटाने औटी यांची साथ सोडल्याचीही चर्चा आहे. लंके यांना रोखण्यासाठी सुजित झावरे यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, जनता लंके यांच्यासोबत होती हे निकालानंतर स्पष्ट झाले. औटी पराभूत होऊ शकत नाही हा समज त्यांनी खोटा ठरविला. औटी हे कार्यकर्त्यांना व लोकांना चांगली वागणूक देत नाहीत, पंधरा वर्षे सत्ता दिली, आता मला संधी, द्या असा प्रचार निलेश लंके यांनी पारनेरसह नगर तालुक्यातील गावांमध्ये केला. गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क केला. महिलांची मोहटादेवी यात्रा व तरुणांची वैष्णोदेवी यात्रा, मुंबईतील पारनेरकरांचे मेळावे या उपक्रमामध्ये माणसे थेट जोडण्यात लंके यशस्वी झाले. या जोडलेल्या माणसांनी लंके यांची निवडणूक हातात घेतली व त्यांना विजयही मिळवून दिला.राहुल झावरे, प्रशांत गायकवाड किंगमेकरऐन निवडणुकीत राहुल झावरे यांनी औटी यांची साथ सोडून लंके यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय समीकरणे बदलली. बांधावर असणारे राष्ट्रवादीचे काही नेते राष्ट्रवादीत स्थिरावले. तीच भूमिका निर्णायक ठरली. झावरे किंगमेकर ठरले. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, उदय शेळके यांनी मधुकर उचाळे, अशोक सावंत, विक्रमसिंह कळमकर, दीपक पवार, बाबाजी तरटे, प्रभाकर कवाद, नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके, प्रताप शेळके, माधव लामखडे, संपत म्हस्के व इतरांना एकत्र ठेवले. ही एकजूट लंके यांना विजयापर्यंत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली.

टॅग्स :Nilesh Sacheनिलेश साबळेparner-acपारनेर