नवजीवन इतरांसाठी आधार व्हायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST2021-04-05T04:19:19+5:302021-04-05T04:19:19+5:30
सेंट मेरी चर्चमध्ये ईस्टर संडेनिमित्त संदेश देताना ते बोलत होते. फादर पीटर खंडागळे, फादर समीर करकत्ता उपस्थित होते. आज ...

नवजीवन इतरांसाठी आधार व्हायला हवे
सेंट मेरी चर्चमध्ये ईस्टर संडेनिमित्त संदेश देताना ते बोलत होते. फादर पीटर खंडागळे, फादर समीर करकत्ता उपस्थित होते.
आज समाजातील परिस्थिती बघितली तर तरुण वर्गामध्ये राग, द्वेष, मोह, व्यसन हे विकोपाला गेले आहेत. सर्वांना निरनिराळ्या ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे, कोरोनासारख्या विषाणूची साथ जगभर पसरत चालली आहे. अनेकांच्या नोकऱ्या, कामधंदे व्यवसाय ठप्प होऊन गोरगरीब जनता हताश झालेली आहे. या सर्व समस्यांवर मात करायची असेल तर खऱ्या अर्थाने आपण एकमेकांचा आधार बनायला हवे आणि आज या कोरोना महामारीच्या काळात ही खूप मोठी गरज आहे. असेही फादर शिनगारे म्हणाले.
ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, सुहास दुशिंग, शशी पगारे, सुहास गायकवाड, विजय आढाव, कैलास भोसले, रमेश कोळगे, सुखदेव शेळके, दिलीप गायकवाड आदीं उपस्थित होते.