कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल आयुक्तांचा आढावा

By Admin | Updated: November 15, 2014 23:38 IST2014-11-15T23:28:02+5:302014-11-15T23:38:52+5:30

शिर्डी :शहरात रस्ते, पाणी, स्वच्छता व वाहनतळासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या़

Review of revenue commissioners on Kumbha Mela | कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल आयुक्तांचा आढावा

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल आयुक्तांचा आढावा

शिर्डी : नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी आलेले भाविक शिर्डीत साईदर्शनासाठी आवर्जून येतात, त्या पार्श्वभूमीवर शहरात रस्ते, पाणी, स्वच्छता व वाहनतळासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्या़ याशिवाय शिर्डीच्या प्रस्ताविक विमानतळाची पाहणी करून कामाचा आढावा घेत पुढील कामासाठी सूचना देण्यात आल्या़
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर डवले यांनी शिर्डीतील पायाभूत सुविधांचा शनिवारी आढावा घेतला़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, संगमनेरचे प्रांताधिकारी संदीप निचित, शिर्डीचे नगरपंचायतचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन गोविंद दाणेज, संस्थानचे कार्यकारी अधिकारी रा़ मा़जाधव, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, राहात्याचे तहसीलदार सुभाष दळवी, कोपरगावचे तहसीलदार इंदिरा चौधरी, राहात्याचे मुख्याधिकारी जयदीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील लोलगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़
कुंभमेळ्यात नाशिकशी भाविकांची बरीचशी गर्दी शिर्डीलाही येणार असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये़ यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे, आवश्यक असल्यास बाह्यवळण रस्त्याचा पर्यायाचा विचार करावा, वाहनतळाची व्यवस्था करावी, शिर्डीत येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे याचाही आराखडा आतापासूनच तयार करावा, भाविकांना शिर्डीतील दर्शन व वास्तव्य सुसह्य व्हावे याकरिता शिर्डीतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबरोबरच सांडपाणी, दर्शनरांग, निवास व्यवस्था,परिसर स्वच्छता याबाबतही संस्थान व नगरपंचायतने एकत्र येत नियोजन करावे, असे डवले यांनी सांगितले़
यावेळी जिल्हाधिकारी कवडे यांनीही आगामी कुंभमेळा व साईसमाधी शताब्दी सोहळ्यात भाविकांची शिर्डीत गर्दी होणार असल्याने पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्यात, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, स्वच्छता, सांडपाणी व पाणी पुरवठ्याची क्षमता वाढवण्यासाठीही संस्थानबरोबर योग्य पावले उचलण्याच्या सूचना दिल्या़
संस्थानचे कार्यकारी अधिकारी जाधव यांनी संस्थानमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची, तर नगरपंचायतचे मुख्याधिकारी जाधव यांनी नगरपंचायतमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली़
(तालुका प्रतिनिधी)
नाशिक कुंभमेळ्यात शिर्डीतही गर्दी होणार याची जाणीव असतानाही या कुंभमेळ्याच्या निधीत शिर्डीला ठेंगा दाखवण्यात आला़ आता सिंहस्थाला केवळ अडिचशे दिवस शिल्लक असताना सुविधांच्या उभारणीसाठी बैठका घेण्यात येत आहेत, संस्थानकडे निधी आहे़ मात्र मान्यतेच्या चक्रव्युहात अडकलेला आहे, विशेष म्हणजे अद्याप नियोजनाचीही वाणवा आहे़ नगरपंचायतला रोजच्या कचऱ्याचा प्रश्नही सोडवणेही मुश्किल आहे़

Web Title: Review of revenue commissioners on Kumbha Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.