महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:24+5:302021-06-21T04:15:24+5:30

शेळकेवाडी येथे मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे संगमनेरचे निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना ...

The revenue squad caught the tempo transporting illegal sand | महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

शेळकेवाडी येथे मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे संगमनेरचे निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे व तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडलाधिकारी बापूसाहेब ससे यांसह कामगार तलाठी युवराजसिंग जारवाल, कोतवाल शशिकांत खोंड आदींच्या पथकाने शेळकेवाडी परिसरातील मुळा नदीपात्रातून शेळकेवाडी-घारगावमार्गे नाशिक-पुणे महामार्गाकडे जाणारा विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो (एम.एच.१६ ए.ई. ९४५५) पकडला. चौकशीअंति कोणताही वाळूचा परवाना नसल्याचे निष्पन्न होताच हे वाहन घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले. ताब्यात घेतलेल्या वाळूच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: The revenue squad caught the tempo transporting illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.