कोपरगावात कारवाईत जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून मिळाला ४७ लाखांचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:59+5:302021-09-02T04:45:59+5:30
कोपरगाव : तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रिया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव ...

कोपरगावात कारवाईत जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावातून मिळाला ४७ लाखांचा महसूल
कोपरगाव : तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली आणि सर्व प्रक्रिया राबवूनही शासनाला दंड न भरलेल्या वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि. ३१) तहसील कार्यालय येथे घेण्यात आला आहे.
या लिलावामध्ये एकूण ४५ वाहने लिलावासाठी ठेवण्यात आली होती. त्यांची एकूण रक्कम ७५ लाख रुपये आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण २६ वाहने ही गेलेली असून त्यातून शासनाला ४७ लाख एवढा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
या लिलाव प्रक्रियेत २७ ट्रॅक्टर, ७ टाटा झेनोन, ५ डम्पर, ५ जेसीबी,१ ट्रक अशा ४५ वाहनांचा समावेश होता. त्यापैकी लिलावात गेलेली वाहने १९ ट्रॅक्टर, ३ टाटा झेनोन, ३ डम्पर, १ ट्रक अशा २६ वाहनांचा लिलाव झाला आहे. उर्वरित १९ वाहने लिलावात गेलेली नाहीत, त्यांचा लिलाव परत १५ दिवसांनी घेण्यात येणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चंद्रे यांनी केले आहे.