राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार
By Admin | Updated: October 14, 2024 17:51 IST2014-09-18T23:17:25+5:302024-10-14T17:51:31+5:30
अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़

राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार
अहमदनगर : १५ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवार (दि़१९) पासून पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा़ बी़ एऩ शिंदे यांनी व्यक्त केला आहे़
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, खानदेशात चांगला पाऊस झाला आहे़ मात्र, १२ सप्टेंबरला पॅसिफिक महासागरात तयार झालेल्या प्रभावी वादळामुळे परतीच्या पावसात खंड पडला होता़ तथापि हे वादळ आता विरले असून, बंगालच्या सागरावरुन ढग मुक्त झाले आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे़ सप्टेंबरच्या अखेरीस व आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे, असे शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ पावसाने खंड दिल्यामुळे पिके सुकू लागली आहेत़ आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास धरणे भरण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)