मराठी भाषा पंधरवाडा ऑनलाइन स्पर्धेचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:47+5:302021-03-07T04:18:47+5:30
या स्पर्धेसाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नवा कृषी कायदा, कोरोना, लॉकडाऊन, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी इत्यादी विषय देण्यात आले होते. ...

मराठी भाषा पंधरवाडा ऑनलाइन स्पर्धेचे निकाल जाहीर
या स्पर्धेसाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नवा कृषी कायदा, कोरोना, लॉकडाऊन, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी इत्यादी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आले असून अशा विद्यार्थ्यांचा मराठी भाषा गौरवदिनी कवी संतोष तांदळे यांच्या हस्ते ग्रंथभेट व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश देशमुख यांनी येथे दिली.
सेवकांच्या मराठी स्वाक्षरी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. त्यामध्ये अनुक्रमे प्रा. डॉ. संजय अरगडे, गणेश जेजुरकर, डॉ. बी. बी. भोसले, संजय पाचोरे यांच्या स्वाक्षऱ्या सर्वोत्तम ठरल्या.
........
निकाल पुढीलप्रमाणे
काव्यलेखन स्पर्धा : प्रथम -वैष्णवी देशमुख, द्वितीय -ऋषीकेश टुपके, तृतीय -साजिद शेख, उत्तेजनार्थ जान्हवी निकम व वैष्णवी होन
प्रश्नमंजुषा स्पर्धा : प्रथम - भक्ती नेहरे, द्वितीय -कुमुदिनी निकम, तृतीय- नीलेश तिरमके, उत्तेजनार्थ आकाश साळवे व माया पवार.
घोषवाक्य स्पर्धा: प्रथम -दीक्षा वाघ, द्वितीय- सय्यद इजाज, तृतीय- स्वप्नाली पवार, उत्तेजनार्थ शिवम चवाळे व लीना इनामके