दहावी परीक्षेचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 23:37 IST2016-06-05T23:29:27+5:302016-06-05T23:37:28+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.६) ला जाहीर होणार आहे.

दहावी परीक्षेचा आज निकाल
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.६) ला जाहीर होणार आहे. जिल्ह्यातून परीक्षेसाठी ७३ हजार ६४० विद्यार्थी बसले होते. दुपारी १ नंतर या विद्यार्थ्यांना आॅनलाईन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात ११ वीच्या दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजची वाढलेली संख्या, आयटीआय सह अन्य प्रवेशाकडे कल वाढलेला आहे. यामुळे दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, शास्त्र आणि वाणिज्य शाखामध्ये प्रवेशासाठी अडचण निर्माण होणार नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात विज्ञानच्या २६ हजार ७५६ आणि वाणिज्य शाखेच्या ७ हजार १६७ जागा आहेत. या ठिकाणी प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कला शाखेच्या २१ हजार १२३ जागा असून व्यवसाय शिक्षणाच्या १ हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. नव्याने स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजचे ८० प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
‘लोकमत’चे आवाहन
दहावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आॅनलाईन उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि गुणपत्रिकेची झेरॉक्स जवळच्या लोकमत कार्यालयात आणून द्यावी. विद्यार्थ्यांनी अहमदनगर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर कार्यालयात छायाचित्रे द्यावीत किंवा छायाचित्रे व गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ल्लंँ१’ङ्म‘ें३@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. गुणवंत विद्यार्थ्यांना लोकमतमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.