आवश्यकता पडली तर निर्बंध कडक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:06+5:302021-02-24T04:23:06+5:30
अहमदनगर : रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २९ जानेवारीच्या आदेशाप्रमाणेच १५ मार्चपर्यंत संचारबंदी राहणार आहे. ...

आवश्यकता पडली तर निर्बंध कडक करणार
अहमदनगर : रात्रीची संचारबंदी आधीपासूनच आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २९ जानेवारीच्या आदेशाप्रमाणेच १५ मार्चपर्यंत संचारबंदी राहणार आहे. आवश्यकता पडली तर कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी माध्यमांकडे पाठविलेल्या व्हिडिओद्वारे नागरिकांना आवाहन केेले आहे. जिल्ह्यात सध्या रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर १२ टक्के आहे. त्यात आता वाढ होताना दिसते आहे. २९ जानेवारीचा आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत होता. तोच आदेश १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यकता पडली तर त्या आदेशात आणखी निर्बंध लादण्याचा विचार केला जाईल. मंदिरे सुरूच राहतील; मात्र शिर्डीप्रमाणे सर्व मंदिरांत नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. कोणत्याही मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता संबंधित व्यवस्थापणाने घ्यायची आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करीत मास्क वापरावेत.
--------
५५०० बेड उपलब्ध
जिल्ह्यात सध्या ५ हजार ५०० बेड उपलब्ध आहेत. व्हॉन्टिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आयसीयू सज्ज आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
----
...तर मंगल कार्यालय सील
सोमवारी नगरमधील मंगल कार्यालयांमध्ये जावून कारवाई केली आहे. आता यापुढे मंगल कार्यालयात गर्दी दिसली तर ते सील केले जातील. पुढील काही दिवस हे सील उघडले जाणार नाही. मास्क वापरलेले दिसले नाही तर नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
-------