जनआधार आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:28+5:302021-04-21T04:21:28+5:30
कोविड काळात रक्ताचा साठा कमी पडत असल्याने सामाजिक बांधीलकी म्हणून हे शिबिर कोविड नियमांचे काटेकोर पालन करून नेवासा तालुका ...

जनआधार आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कोविड काळात रक्ताचा साठा कमी पडत असल्याने सामाजिक बांधीलकी म्हणून हे शिबिर कोविड नियमांचे काटेकोर पालन करून नेवासा तालुका जनआधार संघटनेच्या वतीने घेण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. ३७ जणांनी रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सागर उंडे, डॉ. गुप्ता व रक्तपेढीच्या अनुभवी कर्मचा-यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. संघटनेच्या युवा शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण जावळे, नेवासा तालुकाध्यक्ष अजित वांढेकर, उपाध्यक्ष अजय शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगल भाकरे, कावेरी शिंदे, सचिव बंडू दहातोंडे, संपर्क प्रमुख हरिभाऊ भवार व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ. उंडे, डॉ. गुप्ता व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पोटे यांनी सत्कार केला.
----------
फोटो - २० जनआधार
जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने पांढरी पूल (वांजोळी) येथे सोमवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, डॉ. गुप्ता, सागर उंडे आदी.