गेवराईच्या ‘त्या’ व्यक्तिचा अहवाल निगटिव्ह आला अन् शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:45 IST2020-04-13T12:41:53+5:302020-04-13T12:45:28+5:30
शेवगाव : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ‘त्या’ इसमाचा कोव्हिड १९ संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावा वरील संकट टळले आहे. सदरच्या इसमाने बोधेगाव येथे येऊन दोन डॉक्टरांकडे औषधोपचार घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुका कोरोना संसगार्पासून अबाधित राहिला आहे. अहवाल निगेटिव्ह येताच शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे.

गेवराईच्या ‘त्या’ व्यक्तिचा अहवाल निगटिव्ह आला अन् शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला
शेवगाव : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील ‘त्या’ इसमाचा कोव्हिड १९ संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावा वरील संकट टळले आहे. सदरच्या इसमाने बोधेगाव येथे येऊन दोन डॉक्टरांकडे औषधोपचार घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या इसमाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शेवगाव तालुका कोरोना संसगार्पासून अबाधित राहिला आहे. अहवाल निगेटिव्ह येताच शेवगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील महंतटाकळी येथील एका इसमास कोरोना विषाणुचे लक्षणे दिसताच तो स्वत: हुन तपासणीसाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढे आला. सर्दी, खोकला, श्वासनास त्रास होत असल्याची माहिती त्याने डॉक्टरांना दिली होती. सदर इसमास कोरोना विषाणुचा संशयित असल्याची शक्यता वाटल्याने त्यास तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
सदर इसम आपल्या मुलांच्या दहावीच्या परिक्षासाठी औरंगाबाद येथे काही दिवस वास्तव्यास होता. त्यांनतर तो आपल्या मुळगावी महंतटाकळी येथे परत आला. दरम्यान काही दिवसानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने तो गावा जवळील बोधेगाव (ता.शेवगाव ) येथील दोन दवाखाण्यात उपचारासाठी आला होता. मात्र अस्वस्थ होऊ लागल्याने व श्वसानाचा त्रास वाढल्याने त्याने आपल्या भावाला सोबत घेवुन शनिवारी सायंकाळी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. यावेळी सदर इसमाची तपासणी करुन कोरोना विषाणुंचे लक्ष्णे दिसून येत असल्याने त्याला तातडीने तालुका प्रशासनाने रुग्णाचे स्वँब तापसणी साठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने बोधेगाव वरील कोरोना संकट टळले आहे.
शेवगाव आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच दोन्ही डॉक्टरांचे दवाखाने सील करुन डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी दिली. तसेच शेवगाव शहरातील काही लॉज व इमारती विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी ताब्यात घेणार असल्याचे हिराणी यांनी सांगितले.