केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:49+5:302021-05-27T04:22:49+5:30
या आंदोलनात छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, आश्विन गायकवाड, पप्पू ...

केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा
या आंदोलनात छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, आश्विन गायकवाड, पप्पू जऱ्हाड आदी सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर टीका करताना प्रदेश उपाध्यक्ष घुले म्हणाले की, केंद्रीय कृषी विधेयकाला सहा महिने व मोदी सरकारला दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने शेती आणि शेतकरी यांना उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयक मंजूर केले. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाला सहा महिने पूर्ण झाली आहेत. या विधेयकामुळे भविष्यात शेतकऱ्यांची भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. शेकडो शेतकरी या आंदोलनात शहीद झाले. मोदी सरकार बहुमताच्या जोरावर देशामध्ये शेतकरी, कामगार व शिक्षण विरोधी कायदे व धोरणे लादत आहे, असेही घुले म्हणाले.