खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:41+5:302021-02-05T06:31:41+5:30

अहमदनगर : शहर व परिसरात जलवाहिनी, वीज तारांचे भूमिगत केबल आणि भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती दोन ...

Repair work of excavated roads will begin | खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल

खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल

अहमदनगर : शहर व परिसरात जलवाहिनी, वीज तारांचे भूमिगत केबल आणि भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती दोन दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा प्रमुख रोहिदास सातपुते, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, सदाशिव रोहोकले, माजी नगरसेवक संजय झिंजे, दीपक सुळ, सारंग पंधाडे, दिलदारसिंग बीर आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले की, शहरातील मंजूर झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरु होईल. शहर व परिसरातील रस्ते जलवाहिनीसह वीज तारांचे भूमिगत केबल, भुयारी गटार योजनेच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने विविध योजनांच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शहरातील डावरे गल्ली, धरती चौक ते हातमपूर, जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक, नगर कॉलेज, मंगलगेट रस्ता ईदगाह मैदान, रामचंद्र खुंट ते अशोका हॉटेल रस्ता, गोगादेव मंदिर ते जिल्हा परिषद कॉर्नर, तोफखाना, माळीवाडा अंतर्गत रस्ते, वाडिया पार्क, जुनी महापालिका ते शनी चौक, तख्ती दरवाजा, आशा टॉकीज चौक ते पंचपीर चावडी, जुना बाजार रोड, व दिल्लीगेट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल, असे जगताप म्हणाले.

.....

सूचना फोटो आहे.

....

Web Title: Repair work of excavated roads will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.