कल्याण रोडची दुरुस्त करा, अन्यथा रस्ता राेको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:44+5:302021-09-14T04:25:44+5:30

अहमदनगर : कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गाची चार दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा ...

Repair Kalyan Road, otherwise the road will be blocked | कल्याण रोडची दुरुस्त करा, अन्यथा रस्ता राेको

कल्याण रोडची दुरुस्त करा, अन्यथा रस्ता राेको

अहमदनगर : कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गाची चार दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांसह पुलावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सेनेचे नगरसेवक शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना निदेशक प्रफुल्ल दिवाण यांना याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की रस्त्यावर पावसाळ्यात गुडघ्याएवढे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. येत्या चार दिवसांत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा येत्या शुक्रवारी कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलावर रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिला.

...

१३ सचिन शिंदे

Web Title: Repair Kalyan Road, otherwise the road will be blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.