दोनदा बरखास्त झालेल्या डीबीचे पुनर्गठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST2021-06-16T04:28:39+5:302021-06-16T04:28:39+5:30
तोफखाना स्टेशनची डीबी नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. सराईत गुन्हेगारांना जेरबंद करता न आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोन ...

दोनदा बरखास्त झालेल्या डीबीचे पुनर्गठण
तोफखाना स्टेशनची डीबी नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. सराईत गुन्हेगारांना जेरबंद करता न आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोन महिन्यांपूर्वी डीबी बरखास्त करण्यात आली होती. काही दिवसांनंतर पुन्हा पुनर्गठण करण्यात आले. मात्र, डीबीमधील एक कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला गेला. त्यामुळे पुन्हा डीबी बरखास्त करण्याची नामुष्की ओढावली. आता शाखेतील नवीन पथकासमोर सराईत गुन्हेगारांचा बीमोड करणे आणि गुन्ह्यांची उकल करणे, अशी आव्हाने आहेत. अनलॉकनंतर तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या, घरफोड्यांसह अवैध धंद्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
----------------
हे आहे नवीन पथक
नव्याने स्थापन झालेल्या डीबीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे हे प्रमुख असून पोलीस हवालदार शकील सय्यद, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, पोलीस शिपाई शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, अनिकेत आंधळे यांचा समावेश आहे. आता हे पथक कसे काम करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.