नातेवाईकानेच दोन अल्पवयीन मुलींना पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 17:38 IST2017-09-03T17:37:54+5:302017-09-03T17:38:05+5:30
येठेवाडी (ता.संगमनेर) येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना नातेवाईकानेच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रविवारी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नातेवाईकानेच दोन अल्पवयीन मुलींना पळविले
ल कमत न्यूज नेटवर्कबोटा : येठेवाडी (ता.संगमनेर) येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना नातेवाईकानेच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात रविवारी संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येठेवाडी येथून रमेश धोडींबा डोंगरे (रा.आभाळवाडी) याने जवळच्या नातेवाईकांच्या १३ व १५ वर्षांच्या दोन सख्या बहिणी असलेल्या मुलींना आभाळवाडी येथे आणले. १७ आॅगस्ट रोजी या मुलींना येठेवाडी येथील घरी सोडतो असे सांगून रमेश डोंगरे त्यांना घरी घेऊन गेला. या मुली घरी परतल्या नाही. शोध घेऊनही मुली आढळून आल्या नाहीत. संबंधित मुलींच्या आईने शनिवारी रात्री याबाबत घारगाव पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी रमेश डोंगरे विरूद्ध मुली पळवून नेल्याचा रविवारी गुन्हा दाखल केला आहे. फौजदार मंगलसिंह परदेशी पुढील तपास करीत आहे.