(डमी)
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : महावितरणकडून शेतकऱ्यांकडे सध्या वीज बिलांच्या वसुलीचा तगादा सुरू आहे. मात्र या शेतकऱ्यांना महावितरणकडून कधी बिलेच दिली जात नाहीत. केवळ मार्च एंड आला की शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे.
नगर जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांकडे सुमारे ५ हजार कोटींची थकबाकी आहे
वसुलीसाठी महावितरण कंपनीने कृषी वीज धोरण अंतर्गत निर्लेखन, व्याज आणि विलंब सूट देऊन थकबाकी पुनर्गठीत केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ७० कोटी रुपये वीजबिल भरले आहे. मात्र अजूनही महावितरणची वसुली जोरात सुरू आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना वीजबिल मिळत नव्हते. गावातील वायरमनकडे थकबाकीदारांची यादी देऊन घरोघरी वीज बिल भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अचानक सुरू झालेल्या वसुलीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
--------------
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज थकबाकी
विभाग. शेतकरी संख्या. थकबाकी रक्कम
अहमदनगर ग्रामीण ९३४५९. १३७२
अहमदनगर शहर. ५६०१९. ६४१
कर्जत. ७९९३०. १२१२
संगमनेर. ९९३१८. १२४७
श्रीरामपूर ६४६७८. ५४०
------------------------------------------
एकूण. ३९३४०४. ५०१४
------------------
विज वितरण कंपनीची पठाणी वसुली सुरू आहे, मीटर रीडिंग घेण्यासाठी येत नाहीत, वेळेवर बिलही मिळत नाही. वरिष्ठांनी दट्ट्या लावला की खालचे सगळे थकबाकीच्या याद्या घेऊन वसुलीसाठी पळतात. टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावणे, मोठ्या आवाजात बोलणे असे प्रकार सुरू असतात. वास्तविक मुबलक पावसामुळे गत पाच-सहा महिन्यात विद्युत मोटार सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मात्र तरीही सरासरी विजेचा वापर दाखवून बिल आकारले जाते. -बाळासाहेब फटांगडे, शेतकरी तथा जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना.
---------
बिल वेळेवर मिळत नाही, वीज कर्मचारी कधीतरी बिल घेऊन वसुलीला येतात. रीडिंगचेसुद्धा तसेच आहे. सरासरी वीज बिल आकारणी पद्धत चुकीची वाटते.
-विष्णू मुटकुळे, शेतकरी, शेवगाव