शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी, आठवीच्या १६१० वर्गांना मान्यता

By admin | Updated: September 4, 2024 13:06 IST

अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण आयुक्त यांनी नगर जिल्ह्यात नव्याने १४२२ ठिकाणी आठवीचे तर १८८ ठिकाणी पाचवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण आयुक्त यांनी नगर जिल्ह्यात नव्याने १४२२ ठिकाणी आठवीचे तर १८८ ठिकाणी पाचवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने नियम व अटीनुसार पाचवी आणि आठवीच्या वर्गांना मान्यता दिलेली आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले होते. याबाबचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झालेले आहे. यात ज्या एक किलो मीटर परिसरात पाचवीचा वर्ग आणि तीन किलो मीटर परिसरात आठवीचा वर्ग नाही, अशा ठिकाणी नव्याने या इत्तेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच या वर्गांना स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा संबोधण्यात येणार आहे. या जिल्ह्यात अशा प्रकारे १६१० नव्याने वर्ग सुरू होणार असून त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हास्तरावर अतिरिक्त होणार्‍या शिक्षकांचे या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) शिक्षण विभागाने आधी शिक्षकांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती, पाचवी आणि आठवीचे नव्याने सुरू होणारे वर्ग या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करावी. त्यानंतर श्क्षिकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली होती. -संजय कळमकर, शिक्षक नेते. तालुकानिहाय वर्ग खोल्याची संख्या (५ वी, ८ वी एकत्र) अकोले २८३, संगमनेर २१९, कोपरगाव ८४, राहाता ७३, राहुरी १८४, श्रीरामपूर ७०, नगर १३४, पारनेर २२, श्रीगोंदा १९६, कर्जत २१२, जामखेड १०२, शेवगाव १८०, पाथर्डी ७१, नेवासा ९४ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या ठिकाणी वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांना पाठविला होता. यातून त्यांनी १६१० ठिकाणी वर्ग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे.