विकासकामांचे खरे श्रेय आम जनतेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:26+5:302021-06-02T04:17:26+5:30
अगस्ती साखर कारखानाच्या इथेनॉल निर्मितीस सुरुवात झाली. यावेळी संचालक गुलाब शेवाळे, बाळासाहेब देशमुख, भीमसेेेन ताजणे, उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक ...

विकासकामांचे खरे श्रेय आम जनतेला
अगस्ती साखर कारखानाच्या इथेनॉल निर्मितीस सुरुवात झाली. यावेळी संचालक गुलाब शेवाळे, बाळासाहेब देशमुख, भीमसेेेन ताजणे, उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, महेश नवले, कचरू पाटील शेटे, सुनील दातीर, रामनाथ वाकचौरे, राजेंद्र डावरेे, मच्छिंद्र धुमाळ, एकनाथ शेळके, सुरेंद्र थोरात उपस्थित होते.
पिचड म्हणाले, १९७२ला सक्रिय राजकारणात आलो. आम जनतेची खंबीर साथ मिळाली म्हणून विकासकामे करता आली. जनतेने दिलेले प्रेम विसरू शकत नाही. अगस्ती चालवित ऊस उत्पादक शेतकरी व सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांचे एकीचे बळ मिळत आहे. इथेनॉल निर्मिती हा समाधानाचा क्षण आहे. यापूर्वी दहा कोटींचे राॅ स्पिरिट विकले. एफआरपीप्रमाणे देताना कारखान्यास तोटा सोसावा लागला. साखरेला मागणी नाही. साखर निर्यातबाबत निर्णय गरजेचा आहे. एक दोन वर्षे साखर उद्योगास अडचणी आहे.
गायकर म्हणाले, कारखान्याची स्वयंपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. कार्यक्षेत्रात साडेचार लाख मेट्रिक टन ऊस आहे. भविष्यात यात वाढ होईल.फोटो- अगस्ती