शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

प्रगतीच्या भविष्यासाठी त्यांनी जुन्या प्रथेची 'बेडी' तोडली, पुनर्विवाहाची गाठ बांधली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 11:03 IST

सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय  येत आहे.

संगमनेर : सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय  येत आहे.औरंगाबादजवळील चिते पिंपळगाव येथील विलास गणपतराव गावंडे यांच्या गणेश या मुलाचा किनगाव फुलंब्री येथील पंडितराव सोनवणे यांची मुलगी प्रगती हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, पोस्ट आॅफिसमध्ये काम करणाºया गणेश याचा लग्नानंतर अवघ्या वषार्नंतर दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया प्रगतीवर व गावंडे-सोनवणे कुटुंबावर आभाळ कोसळले. या दु:खद प्रसंगी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील सामाजिक कार्यकर्ते, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व उपप्रांतपाल सुनील कडलग, अहमदनगर गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग या चितेगाव येथे नातेवाईक गावंडे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्रगतीच्या उज्वल भवितव्यासाठी तीचा पुनर्विवाह गणेशचा भाऊ निखिल याच्याबरोबर करवून द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आवाहन केले. त्यातच विलासराव गावंडे यांचे मेव्हणे जवळे कडलग या गावचे सरपंच कैलास अण्णा देशमुख आणि मुलाचे मामा नानासाहेब निवृत्ती मोराडे यांनी हा प्रस्ताव उचलून धरला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रगती-निखिल यांचे व गावंडे-सोनवणे कुटुंबातील सदस्यांचे मन वळविले. काही लोकांना हा प्रस्ताव काही पचनी पडला नाही. मात्र गावंडे-सोनवणे या सकल मराठा-देशमुख समाजातील कुटुंबाने प्रगतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बदलाचे वारे स्वीकारले. विरोधाला न जुमानता मंगळवारी (दि.१०) वेरूळ, औरंगाबाद येथील अक्काबाईचा मठ येथे हा क्रांतिकारी व सुधारणावादी विवाह पार पाडला. अत्यंत साध्या पद्धतीने व केवळ तिनशे लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी माजी आमदार रामभाऊ अप्पा गावंडे, अक्का महाराज, चिते पिंपळगावचे सरपंच कल्याणराव गावंडे, लता कवडे, अंकुश देशमुख,  विजय रोडे, मोहनराव आहेर, सर्जेराव देशमुख, योगेश रामनाथ कडलग, राजेंद्र शांताराम कडलग, किरण देशमुख उपस्थित होते. 

टॅग्स :marathaमराठा