रयत सेवकांची आरोळे कोविड सेंटरला दीड लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:26+5:302021-05-23T04:21:26+5:30

जामखेड : कोरोना संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ...

Rayat Sevaks donate Rs 1.5 lakh to Kovid Center | रयत सेवकांची आरोळे कोविड सेंटरला दीड लाखाची मदत

रयत सेवकांची आरोळे कोविड सेंटरला दीड लाखाची मदत

जामखेड : कोरोना संसर्ग काळात जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त एक लाख एकावन्न हजार रुपये मदतनिधी जमा करून आरोळे कोविड सेंटरला आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दिला. डॉ. रवी आरोळे यांच्याकडे ही रक्कम सुपुर्द करण्यात आली.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. संजय वाघ, डॉ. सुनील बोराडे, सुलताना शेख, कोकणी, जामखेड रयत गट प्रमुख प्राचार्य भगवान मडके, प्राचार्य सोमनाथ उगले, मुख्याध्यापिका के. डी. चौधरी, प्राचार्य रमेश वराट, प्राचार्य ए. एस. गरड, मुख्याध्यापक कल्याण वायकर, नरसेवक महेश निमोणकर, उद्योजक रमेश आजबे, प्रा. रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयुर भोसले, दिलीप ढवळे, हनुमंत नागरे, सतीश टेकाळे, बी. एस. शिंदे, तुकाराम लोहार, बापूराव विधाते, प्रा. घुमरे, अमित गंभीर व रयत सेवक उपस्थित होते.

---

२२ जामखेड मदत

रयत शिक्षण संस्थेच्यावतीने १ लाख ५१ हजार रुपयांचा निधी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते जामखेड येथील आरोळे कोविड सेंटरचे संचालक रवी आरोळे यांच्याकडे सुपुर्द केला.

Web Title: Rayat Sevaks donate Rs 1.5 lakh to Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.