सहाशे कुटुंबांना रेशनकार्ड
By Admin | Updated: July 10, 2014 00:33 IST2014-07-09T23:31:31+5:302014-07-10T00:33:43+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वांगदरी पंचायत समिती गणातील सुमारे ६०० नागरिकांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.

सहाशे कुटुंबांना रेशनकार्ड
श्रीगोंदा : श्रीगोंदा तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वांगदरी पंचायत समिती गणातील सुमारे ६०० नागरिकांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
समाधान योजनेच्या माध्यमातून तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घरपोहोच रेशनकार्ड उपक्रम राबविण्यात येत आहे़ या उपक्रमातील लाभार्थ्यांना माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या हस्ते रेशनकार्ड वाटप करण्यात आले़ यावेळी बोलताना नागवडे म्हणाले, जनजागृती होत नसल्याने शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचत नाहीत़ मात्र श्रीगोंदा तहसील कार्यालयाने समाधान योजनेच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना घरपोहच रेशनकार्ड देण्याचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे़ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर वेगवेगळ्या मार्गाने संक्रांत येते. जनावरे रोगराईला बळी पडतात. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक व पशु विमा उतरविण्याचे आवाहन नागवडे यांनी केले़
तहसीलदार डॉ. विनोद भामरे म्हणाले की, समाधान योजनेच्या माध्यमातून सुमारे सहा हजार पाचशे नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात येणार आहे. लवकरच सर्व नागरिकांना नवीन रेशनकार्ड वाटप करुन श्रीगोंदा तालुका रेशनकार्ड समस्या मुक्त करणार आहे. यावेळी पं.स. सदस्या अनुराधा नागवडे, कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे, एस. पी. साबळे, सुभाष शिंदे यांची भाषणे झाली. महेश नागवडे, रामदास भडांगे यांनी स्वागत केले. बी. के. लगड यांनी सूत्रसंचालन केले़ भाऊसाहेब नागवडे यांनी आभार मानले़(तालुका प्रतिनिधी)